रत्नागिरीत आणखी पाचजण कोरोनाबाधित; रुग्णसंख्या 52 वर

रत्नागिरी:- मंगळवारी सकाळी सकाळी रत्नागिरीकरांना आणखी एक धक्का बसला आहे. सकाळी 16 जणांचे तपासणी अहवाल कोल्हापूर येथून अहवाल प्राप्त झाले असून यातील 5 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 11 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्हयातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 52  झाली आहे. सोमवारी संध्याकाळीच 5 रुग्ण सापडले होते. मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनासह नागरिक देखील चिंतेत सापडले आहेत.