रत्नागिरी:- सातत्याने कोरोना पॉझिटीव्ह रुग्णसंख्या वाढत असल्याने दबावाखाली असलेल्या रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. मंगळवारी सायंकाळी मंडणगड येथील 30 आणि दापोली येथील 25 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व 55 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
मागील काही दिवस सातत्याने पॉझिटीव्ह रुग्णांचा आलेख वाढत आहे. आतापर्यंत 52 पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. अशातच मिरज प्रयोगशाळेने तपासणी अहवाल पाठवण्यास नकार दिल्याने चिंतेत भर पडली आहे. सद्यस्थितीत केवळ कोरोना लक्षण असलेल्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले जात असून इतर सर्वाना क्वारंटाईन करण्यात येत आहे.आतापर्यंत 4 हजार 495 नमुने तपासणी करीता पाठवण्यात आले होते.यापैकी 52 अहवाल पॉसिटीव्ह आले आहेत. 2 हजार 743 निगेटिव्ह, 2 रिजेक्ट, 5 अपूर्ण असल्या कारणाने तर 1 हजार 693 अहवाल प्रलंबित आहेत.