ट्रक- दुचाकी अपघातात एक ठार

चिपळूण-कराड मार्गावरील मुंढे येथील घटना

चिपळूण :- चिपळूण- कराड मार्गावरील तालुक्यातील मुंढे जवळ ट्रक व दुचाकी यांच्यात मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. महेंद्र सुरेश म्हादे ( 41 , तळसर ) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

महेद्र हा पेंटींग व्यावसाय करीत होता. आपले पेंटींग व्यवसायाची कामे अटपून महेंद्र हा आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन चिपळूण- कराड या मार्गाने घरी जात होता. यावेळी तो मुंढे फाटा या ठिकाणाहूण घरी जात असताना त्यावेळी लोटेहून साताऱ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने महेंद्र यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की या धडकेत महेंद्र हा जागीच ठार झाला. महेंद हा माजी सरपंच सुरेश म्हादे यांचा मुलगा आहे. महेंद्र यांच्या दुदैवी घटनेची माहिती मिळताच तळसर- मुंढे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. घटनास्थळी शिरगाव पोलीस दाखल झाले होते. या अपघात प्रकरणी ट्रक चालकाला शिरगाव पोलीसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.