रत्नागिरीत आणखी पाचजण कोरोना बाधित

रत्नागिरी:- आज सायंकाळी 7 जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यातील 5 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 1 अहवाल निगेटिव्ह आला आहे आणि एक अहवाल अपुरा नमुना असल्याने प्राप्त होऊ शकला नाही.

आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 2 रुग्ण रत्नागिरी येथील नर्सिंग सेंटर मधील आहेत. तर एक रुग्ण रत्नागिरी परिसरातील येथील रहिवासी आहे. याव्यतिरिक्त लांजा येथील 2 लहान मुलांचा (वय 9 व 10 वर्षे) अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 47 झाली आहे.