कोरोनावर मात करताना जिल्ह्यात फक्त 44 व्हेंटिलेटर

रत्नागिरी:- जिल्ह्यात केवळ 44 व्हेंटिलेटर असून त्यामध्ये जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात केवळ 21 तर खाजगी रुग्णालयांककडे 23 व्हेंटिलेटर आहे. रुग्ण संख्या वाढत असताना अतिरिक्त व्हेंटिलेटर लागल्यास प्रशासन काय उपायोजना करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्हा शासकिय रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात केवळ 21 व्हेंटिलेटर आहेत. तर खाजगी रुग्णालयात 23 असे केवळ 44 व्हेंटिलेटर जिल्ह्यात उपलब्ध आहे. गेले दोन महिने जिल्ह्यात केवळ 6 रुग्ण होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला तर इतर रुग्ण बरे होवून आपल्या घरी गेले होते. त्यामुळे व्हेंटिलेटरची आवश्यकता भासली नाही. गेले आठ दिवसात मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 42 झाली आहे. तर एकूण दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दररोज चार ते आठ रुग्णांची पॉझिटिव्ह म्हणून वाढ होत असल्याने सध्या असलेले 44 व्हेंटिलेटरवर आरोग्य यंत्रण रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी सक्षम आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.