आपली काळजी आपणच घ्या; परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर

रत्नागिरी:- मुंबई, पुणे या रेड झोनमधुन येणार्‍या चाकरमान्यांच्या लोंढ्याला नियंत्रित करणे शक्य नाही. कोरोना संसर्ग रोखण्यासाठीची आताची परिस्थिती जिल्हा प्रशासनाच्या हाताबाहेर गेली आहे. त्यात स्वॅब तपासण्यासही सांगलीच्या संस्थेने नाकार दिला आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला कोरोना सोबत राहावे लागणार आहे. आपली सुरक्षा आपल्या हातात आहे, अशी हताश आणि जिल्हावासीयांना धक्का देणारी माहिती दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांंनी दिली. 
जिल्हाधिकारी कार्यालायत सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवार उपस्थित होते. ते म्हणाले, कशेळी घटात चाकरमान्यांची गर्दी पाहुन आपल्याला मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून येणार्‍या चाकरमान्यांना रोखणे शक्य नाही. तसेच त्यांना क्वारंटाईन करण्याएवढी आरोग्य यंत्रणाही उपलब्ध नाही. परिस्थितती आता जिल्हा प्रशासनाच्या हाताबाहेर गेली आहे. म्हणून प्राथमिकदृष्ट्या दापोली, मंडणगड येथे सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यासाठी तरूणांचे वाडी कृती दल तयार करण्यात आली आहेत. हे तरूण बाहेरून येणार्‍या चाकरमान्यांना क्वारंटाईन करून ठेवलीत. त्याच्यावर लक्ष ठेवलीत. हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढे जाता येईल. त्यामुळे आता गावा-गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण येणे नाकारता येणार नाही. 
आतापर्यंत जे 42 पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यापैकी 90 टक्के लोकांना कोणतीही लक्षणे नाहीत तरी ती पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 13 लोक रेड झोनमधून आले आहेत.  उर्वरित अनधिकृत, खोटे अ‍ॅड्रेस देऊन आले आहेत. ज्या पद्धतीने मुंबई, पुणे आदी भागातील चाकरमान्यांनी जिल्ह्यात येण्यासाठी खेड, दापोली येथे गर्दी केली आहे. कर्मचारी नेमुनहे त्यावर नियंत्रण मिळवता येत नाही. हे पाहून मार्ग खुले करावे लागणार असे दिसते. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. जिल्ह्याचे नाहरकत प्रमाणपत्र न घेता मुंबई, पुणे आदी रेड झोनमधील चारमानी येत आहेत. 60 ते 70 टक्के लोक पास घेतात. उर्वरित बेकायदेशीर येत आहेत. परवानगी शिवया जिल्ह्यात कोणाला येऊ देऊ नका, हा आमचा स्टँड आहे. मात्र तरी अनधिकृत लोक जिल्ह्यात प्रवेश करती आहेत. आता आपल्याला कोरोना सोबतच राहायचे आहे. स्वतःची सुरक्षा स्वतःच्या हातात आहे. घरीच राहा सुरक्षित राहा, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, असे हातशपणे जिल्हाधिकारी श्री. मिश्रा यांनी स्पष्ट केले. 

कोरोना पॉझिटिव्ह ही करावा लागणार होम क्वारंटाईन

जिल्ह्यात कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात 400 खाटा आहेत. सौम्य लक्षणं असलेल्यासाठी 1500 खाटांची व्यवस्था केली आहे. मात्र हे पुरेसे आहे, असे वाटत नाही. वेळ प्रसंगी प्रॉझिटिव्ह रुग्णालाही होम क्वारंटाईन करण्याची वेळ येणार आहे, असे निराशपणे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले.