हॉटेल व्यावसायिक प्रवीण सुर्वे यांचे निधन

रत्नागिरी:- रत्नागिरीतील सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक प्रवीण प्रभाकर सुर्वे यांचे रविवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 62 वर्षांचे होते.  

शहरातील मांडवी येथील प्रवीण सुर्वे यांनी संपूर्ण जिल्ह्यात आपले नाव कमावले होते. मांडवी येथे हॉटेल स्वरूप त्यांनी सुरू केले. यानंतर त्यानी याच ठिकाणी हॉटेल सी फॅन देखील उभे केले होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. रविवारी दुपारी उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. रविवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव रत्नागिरीत आणण्यात आले. रात्री मुरुगवाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात 2 मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत होती.