संगमेश्वर मध्ये आणखी 4 कोरोना पॉझिटीव्ह  

रत्नागिरी:- जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात आणखी चार पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. चार रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बधितांची संख्या 38 वर पोहचली आहे. हे चारही रुग्ण मुंबईतून दाखल झाले असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचा अहवाल रविवारी सायंकाळी प्राप्त झाले आहेत.
 या सर्वांचे स्वॅब नमुने 9 मे 2020 रोजी घेण्यात आले होते. या चौघांचाही मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. यातील दोन जण चेंबुर येथून आले असून एक जण कांदिवली येथून तर एक जण पनवेल येथून आलेला आहे. या सर्वांना क्वांरटाईन करुन ठेवण्यात आलेले होते. यामुळे आता जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता  38 झाली आहे. त्यापैकी 5 जण कोरोना मुक्त झाले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.