रत्नागिरी:- रविवारी संगमेश्वर पाठोपाठ रत्नागिरी शहरातदेखील आणखी चार रुग्ण सापडले आहेत. रत्नागिरीत झपाट्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येने रत्नागिरीकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
रत्नागिरी शहरात देखील रविवारी क्वारंटाईन केलेल्या रुग्णामध्ये 4 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे संगमेश्वर व रत्नागिरी पकडून आज 8 रुग्णांची वाढ झाली असून जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्या 42 वर पोचली आहे.