डी मार्ट बंद… फक्त घरपोच सेवा

रत्नागिरी:- रत्नागिरीतील डी मार्ट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी डी मार्ट बाहेर रत्नागिरी बाहेरील पासिंगच्या गाड्या खरेदीसाठी मोठ्या संख्येने दाखल झाल्या होत्या. याची माहिती काही सुजाण नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला कळवली होती. या पार्श्वभूमीवर रविवारी डी मार्ट रविवार पासून खरेदीकरिता बंद ठेवण्यात आले. केवळ घरपोच डिलिव्हरी उपलब्ध असल्याचा फलक रविवारी डी मार्ट बाहेर झळकवण्यात आला होता.