जिल्ह्यात 1 हजार 123 कोरोना संशयितांचे अहवाल प्रलंबित

रत्नागिरी :-  जिल्ह्यात तपासणीसाठी 3 हजार 369 नमुने घेण्यात आले होते. यापैकी 34 अहवाल पॉझिटीव्ह तर 2 हजार 207 अहवाल निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर तब्बल 1 हजार 123 अहवालांची अद्यापही प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात आज अखेर 2 हजार 104 जण होम क्वारंटाईन मध्ये आहेत. 
  परप्रांतातून आलेल्या आणि जिल्ह्यात थांबलेल्या व्यक्तींसाठी जिल्ह्यात 63  निवारागृहे सुरु करण्यात आली आहेत. यात 105  जणांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्हा बाहेर जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी 36 हजार 710 जणांनी  जिल्हा प्रशासनाकडे अर्ज कले आहेत. जिल्ह्यातून बाहेर जाण्यासोबत जिल्ह्यात दाखल   होणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात येण्याची विनंती करणाऱ्या अर्जांची एकूण संख्या 35 हजार 423 आहे.