रत्नागिरी:- शुक्रवारी सायंकाळी आलेले 180 आणि रात्री उशिरा आलेले 233 कोरोना चाचणी अहवाल असे एकूण 413 कोरोना अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. दरम्यान रत्नागिरी शहरातील कोरोना बाधित नर्स विद्यार्थिनीच्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांना क्वारंटाईन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या एकूण सर्व अहवालांची संख्या 233 आहे. आलेले सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये रत्नागिरीतील 44, दापोली 22, राजापूर 26, लांजा 10, संगमेश्वर 38, कामथे 63 , गुहागर 6 , मंडणगड 15, कळंबणीतील 3 अहवालाचा समावेश आहे. शुक्रवारी सायंकाळी 180 अहवाल प्राप्त झाले होते. शुक्रवारी रात्री 233 अहवाल आले असून प्राप्त अहवालांची एकूण संख्या 413 असून सर्व 413 अहवाल निगेटिव्ह आहेत.