चिपळूण :- तालुक्यातील पिपळी येथील कॅनाल मध्ये पिंपळी बुद्रुक बोधवाडीतील तीन युवक बुडाले त्यातील दोघांना वाचविण्यात यश आले असून एकजण बुडाला आहे. त्याचा शोध सुरू आहे याबाबत खबर पिपळी सरपंच तंबीटकर यांनी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत सविस्तर वृत असे की, पिंपळी बुद्रुक येथील 10 ते 12 मुले काल दुपारी 4 .30 दरम्यान कनॉल मध्ये पोहोयला गेली होती. 20 ते 22 वयोगटातील हे तरुण पोहण्याचा आनंद लुटत होते. काही जण पोहून कॅनॉल बाहेर पडले इतक्यात पाण्याचा एक मोठा प्रवाह आला आणि प्रविण प्रकाश सावंत,पारस अनिल सावंत व दीपक तुलसीराम मोहिते हे तिघेजण बुडू लागले. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी ते पाण्यात हात पाय हलवू लागले आणि पारस सावंत यांनी झाडाची वेल पकडली तर दीपक मोहिते यांनी कॅनॉलचा कडफा पकडला आणि बाकीच्या मुलांनी त्यांना हात देऊन पाण्याचा बाहेर काढले त्यामुळे दोघांना वाचविण्यात यश आले.
मात्र पाण्याचा मोठ्या प्रवाहात प्रवीण सावंत हा वाहत जाऊन बुडाला त्यामुळे त्याला वाचविण्यात यश आले नाही. त्याचा शोध अद्याप सुरू आहे. याबद्दल शिरगाव पोलीस याना माहिती मिळताच स. पो. नि. बडेसाहेब नाईकवाडे ,एच सी सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली.