रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात आणखी चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेले चार रुग्ण दापोली, खेड, चिपळूण आणि रत्नागिरी येथील आहेत. यापैकी एक नर्सिंग कॉलेज विद्यार्थीनी आहे. तर इतर तीन मुंबईकर चाकरमानी आहेत.
नर्सिंग कॉलेज विद्यार्थिनी रत्नागिरी शहरातील आहे. यामुळे रत्नागिरी शहरात पुढील काही दिवस बंधने लागू करण्यात येणार आहेत. आज मिळालेल्या कोरोना बाधितांमध्ये तीन जण हे मुंबईकर चाकरमानी आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. वाढणारे बहुतांश पेशंट हे मुंबईकर चाकरमानी आहेत. परंतु नर्सिंग कॉलेज विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी घरीच थांबावे. विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी केले आहे.