पूर्ववैमनस्यातून मारहाण; निवळीतील दोघांविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- पूर्ववैमनस्यातून मारहाण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मारहाण ६ मे रोजी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास निवळी-बावनदी पाण्याचे पंप हाऊसजवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामदास लक्ष्मण सावंत (वय ३७, रा. निवळी, बावनदी-बौद्धवाडी) हे बुधवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी चालत जात असताना समाधान रामचंद्र सावंत व प्रभाकर अनंत सावंत यांनी त्यांना अडवून पूर्ववैमनस्याचा राग मनात धरून अश्‍लिल शिवीगाळ केली. त्यावेळी सावंत यांनी तुम्हाला काय सांगायचे ते पोलीस स्टेशनला जावून सांगा असे सांगून ते घराकडे निघून जात असताना समाधान याने रामदास यांच्या उजव्या गालावर हाताच्या ठोशाने मारून प्रभाकर यांनी त्यांचा शर्ट पकडला. यावेळी समाधान याने दांडक्याने मारहाण केली.
याप्रकरणी रामदास लक्ष्मण सावंत यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी समाधान रामचंद्र सावंत व प्रभाकर अनंत सावंत (दोन्ही रा. निवळी, बावनदी-बौद्धवाडी) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.