रत्नागिरी:- दुचाकीस्वाराच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात ५ मे रोजी सकाळी ११ वाजता तिवराड येथे घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवळनाथ नवनाथ ढगे (वय २३, रा. पिंपळगाव, जामखेड, अहमदनगर) हा आपल्या ताब्यातील एमएच-४६/एफ-७९७२ हा निवे ते जयगड असा चालवित जात असताना तिवराड चेक पोस्टवर रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ताब्यातील वाहन अविचाराने व हयगयीने व बेदरकारपणे चालवून समोरून येणार्या दुचाकीस्वाराला धडक देवून अपघात केला होता. या अपघातात दुचाकीस्वार दुर्वांकूर कृष्णकांत शितप (रा. खेडशी) हा जखमी झाला होता.या अपघातप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी ट्रकचालक रवळनाथ नवनाथ ढगे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.