जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांसाठी लाल परी धावणार

रत्नागिरी:- लॉकडाउन काळात जे नागरिक रत्नागिरी जिल्ह्यात अडकून पडले आहेत. त्या नागरिकांना त्यांच्या इच्छुक स्थळी जाण्यासाठी अट व शर्तीवर जिल्हा प्रशासनाने प्रवासासाठी परवानगी दिली आहे. 8, 9 आणि 10 मे या तीन दिवसात सुमारे 28 गाड्या जिल्ह्यातून सोडण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने नुकतेच त्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 
प्रवासासाठी इच्छुक व्यक्तींसाठी एसटी बसेसेवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवास करू इच्छीणार्‍या नारगिकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. प्रवास करणार्‍या व्यक्तीने एसटी सुटण्याअगोदर दोन तास ज्या मुख्यालयातून गाडी सुटणार आहे, तेथे हजर असणे आवश्यक आहे. तसेच संपुर्ण प्रवासात मास्क, वापरणे अनिवार्य आहे. सदर प्रवासाच्या अनुषंगाने एसटी महामंडळाने वेळापत्रक जाहीर केले आहे. 
लॉकडाऊनमध्ये आडकलेल्या नागरीकानां (नोंदणीकृत) अंतरजिल्हा प्रवासासाठी सोडण्यात येणार्‍या गाडयाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
शुक्रवारी 6 गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये रत्नागिरी – सिंधुदुर्ग –14.00 (वाजता), चिपळूण- सिंधुदुर्ग 14.00, लांजा- सिंधुदुर्ग 15.00, रत्नगिरी- अलिबाग 14.00, चिपळूण- अलिबाग 14.00, दापोली- अलिबाग 14.00
9 मे 2020 – एकुण 16 गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये रत्नागिरी- सिंधुदुर्ग 12.00 (वाजता), देवरूख- सिंधुदुर्ग 12.00, दापोली- सिंधुदुर्ग 13.00, चिपळूण- बुलढाणा- 18.00, गुहागर- बुरढाणा 18.00, गुहागर- लातूर 17.00, मंडणगड- लातूर 15.00, चिपळूण- भंडारा 14.00, दापोली-भंडारा 14.00, रत्नागिरी -अलिबाग 12.00, चिपळूण- अलिबाग 14.00, राजापूर- अलिबाग 14.00, देवरूख-अलिबाग 12.00, मंडणगड-अलिबाग 14.00,  गुहागर-सातारा 12.00, दापोली- सातारा 12.00
तर 10 मे 2020 ला 3 गाड्या सोडल्या जाणार आहेत. त्यामध्ये खेड- गोंदिया 14.00, मंडणगड- गोंदिया 14. 00, चिपळूण-अमरावती 12.00 अशा एकुण 28 फेर्‍या तिन दिवसात सोडण्यात येणार आहेत.