घरपोच मद्यविक्रीचा आदेश बदलला तरीही मद्यप्रेमींना प्रतिक्षा

रत्नागिरी:- जिल्हा प्रशासनाने दारू विक्री संदर्भात 8 तासात ऑनलाइन दारू विक्रीचा निर्णय बदलला आहे. त्याऐवजी आता जिल्ह्यातील सर्व दुकानांवर योग्य ते नियम आणि निकष पाळून सीलबंद दारूची विक्री करण्याचे नवीन आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण नारायण मिश्रा यांनी काढले आहे. मात्र याची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई होताना दिसून येत आहे.

राज्यात ठिकठिकाणी वाईन्स शॉप बाहेर तळीरामांनी लांबच्या लांब रांगा लावल्यात. पण, कोरोनाच्या परिस्थितीत ही बाब गंभीर असल्यामुळे काही जिल्ह्यात दारू बंदी करण्यात आली. पण, यावर तोडगा म्हणून दारुची होम डिलिव्हरी (Home Delivery) सुरू करण्याचा विचार पुढे आला. काही राज्यांनी याची सुरुवात देखिल केली आहे.राज्यात रत्नागिरी जिल्हात घरपोच दारू देणारा जिल्हा म्हणून चर्चेत आला. जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत मिश्रा यांनी तशी घोषणा केली.  

नियमावलीही तयार करून मद्यपींना आधी ऑनलाइन फॉर्म भरावा लागले. त्यानंतरच त्यांना घरपोच दारूची सेवा देण्याचे निश्चित झाले. काही कारणास्तव प्रशासनाची ही योजनाही बारगळली .अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी आठ तासांमध्ये नवा आदेश जारी केला. त्यानुसार कोरोनाच्या संसर्ग बाबतचे सर्व नियम पाळून दारू दुकानांना सीलबंद दारू विकण्याची परवानगी दिल्याचे नव्याने आदेश काढले. त्यामुळे तळीरामांना मोठा दिलासा मिळाला आहे.