तळीरामांसाठी खुशखबर; मिळणार घरबसल्या दारु ?

 रत्नागिरी:- दीड महिन्यापेक्षा अधिक काळ बंद राहिलेली दारुची दुकाने उघडण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. परंतु मद्यपींना दारु दुकानात दारु मिळणार नसून घर बसल्या दारु मिळणार आहे. यासाठी प्रशासन गुगल लिंक, व्हाट्स अँप आणि फोन कॉल द्वारे ऑर्डर घेऊन घरपोच मद्य पोचवण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 

लॉक डाऊनच्या काळात तब्बल 40 दिवसांपेक्षा अधिक काळ मद्याची दुकाने बंद राहिली. नुकताच राज्य शासनाने मद्याची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला. परंतु अनेक जिल्ह्यात दारु दुकानांवर मोठी गर्दी झाली. यामुळे जिल्ह्यात अद्याप दारुची दुकाने उघडली नव्हती. परंतु आता मद्यपींची प्रतीक्षा संपुष्टात येण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हा प्रशासन नवीन निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने मद्यविक्री सुरू केली जाण्याची दाट शक्यता आहे. यासाठी गुगल लिंक, व्हाट्स अँप आणि फोन कॉल वर ऑर्डर घेऊन मद्य थेट मद्यपींपर्यंत पोहचवले जाणार आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते.