जिल्ह्यात आज आणखी दोन कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण

रत्नागिरी :- जिल्ह्यात आज आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. खेड तालुक्यातील कळंबणी आणि चिपळुण तालुक्यातील कामथे येथील हे दोघे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल आज प्राप्त झाले आहेत. मुंबईहुन आलेल्या या दोघांना हाॅस्पिटल क्वारंटाईन करण्यात आले होते.

मंगळवारी एकाच दिवशी चार कोरोनाबाधीत रुग्ण सापडले होते. आज पुन्हा दोन रूग्ण सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हे दोन्ही रूग्ण मुंबईहून रत्नागिरीत आले होते. गेल्या 4 दिवसात 11 रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह आढळल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 17 झाली आहे. जिल्ह्यात सापडलेल्या 17 रुग्णांपैकी पाच पूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 11 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.