आणखी एक अधिकारी कोरोनाबाधित क्षेत्रातून जिल्ह्यात दाखल

रत्नागिरी :- जिल्ह्यात मुंबई, पुणे सारख्या भागातून आलेले प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह निघत असताना आता आणखी एक अधिकारी थेट कोरोना बाधित क्षेत्रातून जिल्ह्यात दाखल झाला आहे. जिल्हा परिषदेत संबंधित अधिकारी हजर झाल्याने जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे. जि. प. अध्यक्ष रोहन बने यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्याला काही दिवस घरीच राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच एका सोसायटीत एक उच्च अधिकारी थेट उस्मानाबाद येथून कुटुंबासह दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. आता जिल्हा परिषदेतील एक वरिष्ठ अधिकारी थेट सातारा येथून रत्नागिरीत दाखल झाला असून बुधवारी जिल्हा परिषदेत हजेरी लावली. सातारा येथे कोरोनाचा मोठया प्रमाणावर शिरकाव झाला असून साताऱ्यात दुपारी दोन वाजेपर्यंत फिरण्यास मुभा आहे. अशा भागातून साहेब आल्याने शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचेच धाबे दणाणले. ही बातमी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यानी याबाबत माहिती घेतली असता त्या अधिकाऱ्याने मेडिकल सर्टिफिकेट घेतल्याचे समोर आले. यावेळी श्री बने यांनी  समबंधीत अधिकारी यांना काही दिवस घरीच थांबून काम करण्याच्या सूचना केल्या आहेत.