रत्नागिरी जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी २४ समुपदेशकांची टीम तैनात

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा उपक्रम

रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विदयार्थ्यांसह पालक शैक्षणिक परिस्थितीबद्दल संभ्रमात आहेत.या सर्वांना करियर तसेच विविध समस्यांबाबत समुपदेशन करण्यासाठी राज्य सरकारने जिल्हानिहाय मार्गदर्शक व समुपदेशक नेमले असून ते विनाशुल्क सेवा देणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकूण 24 समुपदेशक हे काम करणार आहेत.
या सर्व समुपदेशकांनी व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था, मुंबईच्या माध्यमातून समुपदेशनाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे.हे समुपदेशक अनेक शाळा व संस्थांमध्ये वर्षभर विद्यार्थ्यांना करियरविषयक मार्गदर्शन करत असतात.राज्य शासनातर्फे इ. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कलचाचणी व अभिक्षमता चाचणी घेतली जाते. या चाचणीचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे.या निकालासंदर्भात पालक व विद्यार्थांच्या समस्या असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
रत्नागिरी जिल्ह्यातील समुपदेशकांची नावे व संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे :
1) मिलिंद कडवईकर – 9767568798
2) गणेश कुलकर्णी – 9975129235
3) प्रदीप यादव – 9767604806
4) मंदार बापट – 9420731816
5) रामदास सावंत – 9423323270
6) मंगेश मोने – 9405595120
7) विश्राम सूर्यवंशी – 9881975590
8) अजित चव्हाण – 7588577051
9) बळवंत देशमुख – 9423856088
10) श्रीमंत शिरोळे – 9075246174
11) भास्कर कदम – 9421142018
12) नारायण पाटील – 94054332930
13) संदेश रहाटे – 9623766593
14) संदिप संदे – 9145646263
15) रामचंद्र चव्हाण – 8275285259
16) देशमुख सर – 9823609975
17) प्रभाकर धोत्रे – 7057288684
18) संदीप शिर्के – 9552064640
19) रत्नप्रभा जोशी – 7972152631
20) दिपक गमरे – 9271891433
21) सुरेश डोणे – 9767569170
22) धनाजी बेंद्रे – 8275456028
23) जाधव सर – 8888004757
24) पटेल सर – 9766854570
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था रत्नागिरीच्या समन्वयक प्रा. वैशाली पाटील मॅडम यांनी केले आहे.