रत्नागिरी :- तुमचे एटीएम ब्लॉक झाले आहे, अशी बतावणी करून ६६ वर्षीय वृद्धाला ३८ हजार ९९९ रूपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हिंदी भाषिकावर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अच्युत बळवंत पाटणकर (वय ६६, रा. माऊली, आदर्शनगर, मिरजोळे) यांच्या मोबाईलवर सोमवारी सकाळी ११.३९ वाजता एक कॉल आला होता. यावेळी तुमचे एटीएम आहे का? तुम्ही एटीएम वापरले का? असे विचारून पाटणकर यांनी बँकेत जावून खात्री करतो असे सांगितले होते.यावेळी तुम्ही बँकेत जाईपर्यंत तुमचे एटीएम ब्लॉक होईल. तुमच्या एटीएमची माहिती द्या, असे सांगून एटीएमबाबत सर्व माहिती जाणून घेऊन पाटणकर यांची ३८ हजार ९९९ रूपयांची फसवणूक केली.