रत्नागिरी :- रत्नागिरीत सोमवार पासून लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली. पूर्व परवानगीने दारूची दुकाने उघडली जाणार आहेत. मात्र ही दुकाने उघडण्यापूर्वीच तळीरामानी सोमवारी दारू दुकांनाबाहेर रांग लावली. अत्यंत सोशिक तळीरामानी रांग लावताना सोशल डिस्टन्स नियमांचे पालन मात्र केले.
सोमवारपासून वाईन शॉप उघडायला परवानगी देण्यात आली आहे. मात्र दीड महिना वाट पाहिलेल्या तळीरामच्या संयमाचा बांध सोमवारी फुटला. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून तळीरामानी दारु दुकानांबाहेर हजेरी लावली. सकाळी दहा वाजता आठवडा बाजार येथील जोशीला वाईन शॉप बाहेर शेकडो तळीरामानी लाईन लावली. यावेळी 3 फुटाचे अंतर सोडून नियमांचे पालन केल्याचे दिसून आले. दुकान बंद मात्र दुकांनाबाहेर तोबा गर्दी असे सोमवारी सकाळी चित्र होते.