रनपार मधील 13 जण क्वारंटाईन

रत्नागिरी :- कोरोनाबाधित रुग्णाने चार दिवस पावस रनपार येथे वास्तव्य केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पावस रनपार परिसरात आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. येथील 13 जणांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाने ट्रक मधून मुंबई ते रत्नागिरीमार्गे बांबवडे असा प्रवास केला. हा ट्रक रत्नागिरीतील एका कंपनी मध्ये थांबला होता. ट्रक चालक व अन्य प्रवासी यांनी तेथे ३ दिवस मुक्काम केला होता. त्यानंतर २६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हा ट्रक रत्नागिरी मधून कोल्हापूरच्या दिशेने निघाला. 26 एप्रिल रोजी रात्री ९ वाजता साखरपा आणि रात्री ११ वाजता तो बांबवडे येथील पेट्रोल पंपावर पोहोचला. याचवेळी चालकांच्या मालकाने व्हिडिओ कॉलिंग मध्ये अन्य तिघांना पाहिल्यानंतर त्यांना गाडीतून उतरविण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर तिथल्या पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेऊन सीपीआर येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्यात या रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

या पार्श्वभूमीवर रनपार या परिसरात या रुग्णसोबत जे संपर्कात आले त्याचा शोध घेण्याचे पोलिसांचे काम सुरु केले होते. हा रुग्ण गाडीतून फारसा बाहेर न पडल्याने फारसा धोका नसला तरीही खबरदारी म्हणून रत्नागिरी पोलिसांनी तेथील १३ जणांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना क्वारंटाइन केले आहे अशी माहिती श्री. इंगळे यांनी दिली.