महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा

रत्नागिरी :- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 60 वा वर्धापन दिन सोहळा रत्नागिरी जिल्हयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य व एकमेव शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जिल्हयात एकाच ठिकाणी असे ध्वजारोहण करण्याचे निर्देश जारी केलेले होते. त्यामुळे रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हा एकच ध्वजारोहण सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते आजचं ध्वजारोहण झालं. सोशल डिस्टसिंग ठेवून हे ध्वजारोहण करण्यात आलं.  
आजच्या या ध्वजारोहण सोहळयास जिल्हा परिषद अध्यक्ष  रोहन बने, आमदार राजन साळवी, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड तसेच उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे, विकास सुर्यवंशी, तहसीलदार शशिकांत जाधव आदिंची उपस्थिती होती.