रत्नागिरी:- कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे गरीब गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी विविध सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. अशातच आता जिल्ह्यातील पोलीस कर्मचार्यांनीही पुढाकार घेतला आहे .रत्नागिरी जिल्हा पोलीस आॅफ क्रेडिट सोसायटीने गरिबांना अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी पोलीस अधीक्षक डाॅ.प्रवीण मुंढे यांच्या उपस्थितीत एक लाखाचा धनादेश दिला आहे. यातून शहरासह जिल्ह्यातील गरीब व गरजूंना धान्य वाटप करण्यात येणार आहेत.
डाॅ.प्रविण मुंढे यांच्या संकल्पनेतून आर्मीच्या माध्यमातून गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे. मदत करणार्या सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी एकत्र येत, एकत्रिरित्या मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी सर्व परिसरातील गरजूंची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. अन्नधान्य वाटपाच्या उपक्रमांमध्ये पोलीस को‚आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने पुढाकार घेत अध्यक्ष हेमंत गिरकर , उपाध्यक्ष सुभाष माने, सुभाष भागणे यांच्यासह संचालक दीपक उर्फ दिपू साळवी, दीपक साळवी, रामचंद्र जगताप, सचिन सावंत, गिरीष सावंत, विनायक राजवैद्य, सौ.विनया नरवणे यांनी सुमारे एक लाख पोलीस अधिकार्यांमार्फत सामाजिक संस्थांकडे सुपूर्द केला आहे.पोलीस कर्मचारी घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.