रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना संशयितांच्या प्रलंबित अहवालाची संख्या अचानक 200 च्या घरात गेली आहे. जिल्ह्यात तपासणीसाठी 806 घेण्यात आले. यापैकी 6 पॉझिटिव्ह, 600 निगेटिव्ह तर प्रलंबित असलेल्या अहवालांची संख्या 197 वर पोहचली आहे.
प्रलंबित असलेल्या अहवालात जिल्हा आरोग्य अधिकारी स्तरावरील 64, उपजिल्हा रुग्णालय येथील कामथे 35, उपजिल्हा रुग्णालय कळंबणी 14, ग्रामीण रुग्णालय लांजा 10, ग्रामीण रुग्णालय दापोली 35, ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर 29, ग्रामीण रुग्णालय गुहागर येथील 10 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात होम क्वारंटाईनखाली असणाऱ्यांची एकूण संख्या 1 हजार 118 आहे. संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 544 आहे.