पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता

रत्नागिरी:- बुधवारी रत्नागिरी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात हजेरी लावलेला अवकाळी पाऊस 3 मे पर्यंत मुक्कामी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील दोन दिवस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस हजेरी लावेल अशी शक्यता आहे. 

बुधवारी संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. चिपळूण, संगमेश्वर, देवरुख, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर पट्टयात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस कोसळला. बुधवारी सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावली होती. अनेक भागात अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ पाऊस बरसत होता. दरम्यान 3 मे पर्यंत अवकाळी पावसाचा जिल्ह्यत मुक्काम असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या कालावधीत सोसाट्याचा वारा देखील सुटेल. विजांच्या लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटात अवकाळी पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.