पाच हजार जणांना मिळाला गावातच रोजगार

रत्नागिरी :- गावातच रोजगार मिळावा यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन हजार कामे सुरु झाली आहेत. त्यात पाच हजार कामगार कार्यरत झाले आहेत. केंद्र शासनाने एप्रिल महिन्यापासून दिवसाचा रोज 32 रुपयांनी वाढ केली आहे. 206 रुपयांवरुन 238 रुपये केला आहे.

कोरोनामुळे राज्यातच नव्हे तर देशात लॉकडाऊन केला होता. काही दिवसांपुर्वी त्यात शिथिलता दिली गेली. अनेकांना रोजगार नसल्यामुळे कौटुंबिक खर्च करणे अशक्य झाले आहे. त्यावर उपाययोजना म्हणून शासनान मनरेगातील कामे निकष पाळून सुरु करण्याच्या सुचना दिल्या. त्याची अंमलबजावण कोकण विभागात सुरु झाली आहे. कोकणात 5 हजार 025 कामे सुरु झाली असून त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील पावणेदोन हजार कामांचा समावेश आहे. जिल्ह्यात सुरु झालेल्या कामांमध्ये कृषि, वनपरिक्षेत्र, वनप्रकल्प विभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कामे आहेत.