मनाई आदेश भंग प्रकरणी दोघांवर गुन्हा

रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना सोमवारी दुपारी 12. 30 वा. सुमारास भाट्ये चेकपोस्ट येथे घडली. 
   सुहास विष्णू साळवी (45,रा. कसोप, रत्नागिरी ) आणि राजेश विश्वनाथ तोडणकर (42, रा. कुर्ली, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. सोमवारी दुपारी हे दोघे रिक्षामधून पावस ते रत्नागिरी असे येत होते. ते भाट्ये चेकपोस्ट येथे आले असता पोलिसांनी त्यांना थांबवले. त्यावेळी या दोघांनी दारूच्या नशेत मोठमोठ्याने बोलून  सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केला. तसेच ते जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करत एकत्रीतरित्या फिरत असल्याने त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.