आणखी अहवाल 12 निगेटीव्ह, केवळ एक अहवाल बाकी
रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्याने कोरोनावर 99 टक्के मात केली आहे. जिल्हा रुग्णालयातून तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या 13 अहवालांपैकी 12 अहवाल जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेले 12 च्या 12 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. केवळ एका संशयिताचा अहवाल येणे बाकी असून जिल्ह्याची शंभर टक्के कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात घेण्यात आलेल्या तपासणी नमुन्यांपैकी 12 अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व 12 अहवाल निगेटिव्ह आहेत. सोमवारी सायंकाळ पर्यंत च्या आकडेवारीनुसार 13 अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 12 अहवाल आले आहेत.जिल्ह्यात यापूर्वी 6 कोरोना बाधित रुग्ण सापडले होते. यापैकी 5 ठणठणीत बरे झाले. 1 जण उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला. यानंतर प्रशासनाने कडक पाऊले उचलली. देश व जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला क्वारंटाईन करण्यात आले. कोरोना बाधित रुग्ण सापडलेल्या भागात काटेकोरपणे आरोग्य तपासणी करण्यात आली. असे अनेक खबरदारीपर निर्णय घेतल्याने जिल्हा शंभर टक्के कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.