कोकण नगर येथे प्रौढाची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी :- शहरानजीकच्या कोकणनगर येथील प्रौढाने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी 1 वा. सुमारास उघडकीस आली. 

   यल्लप्पा शंकर हट्टीकर (65, रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ सुरेश शंकर हट्टीकर (55, रा. नाचणे, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसाना खबर दिली. त्यानुसार, यल्लप्पा हे पत्नीसह कोकणनगर येथे राहत होते. मंगळवारी दुपारी त्यांची पत्नी दूध आणण्यासाठी घराबाहेर गेली होति. ती परतली असता तिला घराचा दरवाजा बंद दिसला म्हणून तिने पतीला हाक मारली. परंतु घरातून कोणताही प्रतिसाद न आल्याने तिने शेजाऱ्यांना हि बाब सांगितली. शेजाऱ्यांनी घराची कौले काढून पहिले असता त्यांना घराच्या मागील पडवीत लोखंडी पाईपला  ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत  यल्लप्पा दिसून आला.त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यल्लप्पाला तपासून मृत घोषित केले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.