रत्नागिरी :- घरासमोर मोठमोठ्याने ओरडत व शिवीगाळ करत भांडण करू नका, माझा मुलगा अभ्यास करतो आहे असे सांगणाऱ्या नागरिकाच्या अंगावर धावून जात त्याच्या डोक्यावर दगड मारून दुखापत केल्याची घटना स्टेट बँक कॉलनी येथे घडली आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादी राजेश सुधाकर नेने (वय ५० रा. स्टेट बँक कॉलनी रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. संशयित आरोपी संदीप विटकरी रा. क्रांतीनगर व तीन माणसे घरासमोर शिवीगाळ करीत भांडत होती व त्यावेळी तुम्ही येथून निघून जा असे सांगावयास गेलेल्या फिर्यादी यांना हि मारहाण झाली आहे. पोलिसांनी याबाबत शहर पोलीस स्थानकात संशयित आरोपीवर भा. दं. वि. क. ३३६, ३३७, ३५२, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.