पाळंदे समुद्रकिनारी आढळला मृत डॉल्फिन मासा

दापोली :- तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनारी मृत डॉल्फिन मासा आढळून आला. वनविभागाने या महाकाय मृत माशाची रविवारी विल्हेवाट लावली.
दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनाऱ्याला एक महाकाय डॉल्फिन मासा लागला होता मात्र हा डॉल्फिन मृत होता. वनविभागाला याची मिळताच रविवारी वनविभागाचे कर्मचारी पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाले. त्यानंतर समुद्रकिनारीच मोठा खड्डा काढून या मृत माशाची विल्हेवाट लावण्यात आली. याचं वजन जवळपास 250 ते 300 किलो होतं. तर लांबी 2.70 मीटर आणि गोलाई 1.80 मीटर होती, अशी माहिती दापोलीचे परिक्षेत्र वनाधिकारी वैभव बोराटे यांनी दिली.