खालगाव गोताडवाडीतील युवकांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून ठेवला आदर्श

जीवनावश्यक वस्तू व 2100 मास्क वाटप

रत्नागिरी :- ग्रामीण भागातील बांधकाम मजूर,शेतीची कामे थांबले असल्याने कामगारांचे हाल होत आहे.शासन आपल्या सर्वोतोपरी मदत करत आहे तरीही सर्वांना माणूसकीचा एक हात म्हणून खालगाव मधली गोताडवाडी मधील युवा तरूणांनी एकत्र येत अर्धा दिवस शेतीची कामे करून आपल्या कष्टातील पैसे काढून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. गावातील तरूणांनी पुढे येवून आलेल्या संकटावर मात कशी करता येईल हा आदर्श निर्माण केला आहे. जाकादेवी देवस्थान कमिटी, मुंबई मंडळ खालगाव गोताडवाडी यांच्या माध्यमातून मदतीचा हात म्हणून गरजूंना जीवनावश्यक वस्तू साखर,चहा पावडर,साबण,2100 मास्क वाटप करण्यात आले.

तसेच कोरोनावर मात करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी संतोष गोताड,दत्ताराम गोताड यांनी मार्गदर्शन केले. हे वाटप जाकादेवी पंचक्रोशीत करण्यात आले यावेळी जाकादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विष्णू गोताड,सरपंच दत्ताराम गोताड, मुंबई मंडळ अध्यक्ष दिनेश रेवाळे, योगेश गोताड,गणपत गोताड,दिपक गोताड, मनोहर गोताड, शांताराम गोताड, अनंत गोताड, निलेश गोताड युवा सामाजिक कार्यकर्ते सागर गोताड, प्रथमेश गोताड,तुषार गोताड,प्रमोद गोताड,सचिन गोताड, राकेश राकेश गोताड,वैभव गोताड, अंकुश गोताड,ऊल्हास गोताड,कैलास,प्रविण गोताड व जाकादेवी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.