बुडालेल्या दुसऱ्या तरुणाचाही मृतदेह सापडला

रत्नागिरी :- खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेले दोघे बुडाल्याची घटना तालुक्यातील सांडेलावगण-कासारी येथे घडली होती. यातील एकाचा मृतदेह लगेच सापडून आला होता तर दुसरा बेपत्ता होता. बेपत्ता तरुणाचा मृतदेह रविवारी सकाळी हाती लागला. बुडालेल्या ठिकाणापासून 10 फूट अंतरावर हा मृतदेह सापडला. 

सांडेलावगण-कासारी ग्रुप ग्रामपंचायत विभागातील खाडीवर कालवे काढण्यासाठी गेलेल्या चाफेरी गावच्या दोन ग्रामस्थांचा पाण्याचा अंदाज न आल्याने खाडीमध्ये ओहोटीच्या प्रवाहात वाहत जाऊन बुडून मृत्यु झाला. त्यापैकी एका गृहस्थाचा मृतदेह सापडला संतोष तुकाराम पिंपळे यांचा शोध सुरु होता. रविवारी सकाळी 9 वाजता दुसरा मृतदेह सापडला. बुडालेल्या ठिकाणापासून नजीकच दुसरा मृतदेह सापडला. खाडीतील चिखल आणि कमरेला असलेली कालव्यांची पिशवी यामुळे हा तरुण त्याच ठिकाणी रूतला असावा अशी शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे.