उद्योजक आसिफ खलपे यांच्यामार्फत १०० गरजुंना मदत

रत्नागिरी:-

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सध्या संपुर्ण लॉकडाऊन आहे. मात्र याच लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.समाजातुन अनेक जण गरजु लोकांना मदत करत आहेत.आपल्या समाजातील काही व्यक्ती उपाशी आहेत. त्यांची मुले उपाशी आहेत. अन्नासाठी वणवण करत आहेत. हातचे पैसेही संपलेले आहेत. पैशासाठी, नोकरीसाठी बाहेर ही पडता येत नाही. ज्यांचे हातावर पोट आहे.लॉकडाऊनच्या काळात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. एवढेच नव्हे तर, परराज्यातील, प्रांतातील काही व्यक्ती आपल्याकडे येऊन अडकलेल्या आहेत. त्यांच्यावर ही उपासमारीची वेळ आहे. ही बाब उद्योजक आसिफ खलपे यांना समजताच आपणही या समाजाचे काही तरी देणे लागतो या समाज भावनेतुन सामाजिक कार्यकर्ते,उद्योजक आसिफ खलपे यांनी समाजातील गरीब,गरजु व परप्रांतीय अशा तब्बल १०० लोकांना अन्नधान्य देऊन मदत केली आहे. समाजातील गरीब, गरजु व परप्रांतीय लोकांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत पोहचुन ही मदत केली आहे. ही मदत मोठ्या प्रमाणात नसली तरी आपण समाजभावनेने एक छोटासा खारीचा वाटा उचलला आहे, असे उद्योजक आसिफ खलपे यांनी सांगितले. या कोरोनाच्या काळात ही आसिफ खलपे यांनी मदत केली व याचा कुठेही गाजा वाजा न करता निस्वार्थी व तसेच समाज भावनेतुन ही मदत केली आहे.