रत्नागिरी:- मागील 24 तासात मिरज येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी 14 अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहे. आज रोजी प्रलंबित अहवालांची संख्या 15 आहे. जिल्ह्यात मंडणगडसह 14 ठिकाणी (सर्व तालुका मुख्यालये ) शिवभोजन थाळी केंद्र सुरु झाली आहेत. यातून दररोज 2000 थाळयांचे वाटप होत आहे.
केशरी कार्ड धारकांना प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ (70 टक्क्यांच्या मर्यादेत) सवलतीच्या दरात वितरीत करण्यात जिल्ह्यात 24 एप्रिल पासून सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात तपासणीसाठी 537 घेण्यात आले होते. यापैकी 6 अहवाल पॉझिटीव्ह तर 514 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 15 अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. जिल्ह्यात होम क्वारंटाईनखाली असणाऱ्यांची एकूण संख्या 1118 आहे. परप्रांतातून आलेल्या आणि जिल्ह्यात थांबलेल्या व्यक्तींसाठी जिल्ह्यात 63 निवारागृहे सुरु करण्यात आली आहेत. यात 243 जणांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेल्या 10427 जणांच्या जेवणाची व्यवस्था, शिवभोजन थाळी, तहसिल कार्यालये आणि एनजीओच्या माध्यमातून करण्यात आली आहे.