कुर्‍हाडीवरून झालेल्या झटापटीत एकजण जखमी

राजापूर:- तालुक्यातील आडिवरे नवेदर येथे कुर्‍हाडीचे देवघेवीवरून झालेल्या वादात कानाला सुरा लागल्याने एक जण जखमी झाला.याबाबत नाटे पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नवेदर येथील राहणारे फिर्यादी सदानंद दळवी व आरोपी संदीप फणसे यांच्यामध्ये कुर्‍हाडीचे देवाण घेवीवरून वाद सुरू झाला. त्यातून दोघांच्यात झटापट झाली. यावेळी आरोपीने संदीप याने आपल्या बरोबर आणलेला सुरा फिर्यादी सदानंद याच्यावर उगारला. यात सुरा कानाला लागून सदानंद जखमी झाला. याबाबत नाटे पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.