कोरोनाबाधित मुलासह तिघे होम क्वारंटाईन
रत्नागिरी:- कोरोना संक्रमित सहा महिन्याच्या चिमुकल्या बालकासह जिल्ह्यातील कोरोना निगेटिव्ह आलेल्या 3 जणांना आज होम क्वारंटाईन होण्यासाठी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधित सहा रुग्ण होते. यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दोन जण यापूर्वीच कोरोनामुक्त झाले होते. साखरतर येथील 2 महिला आणि एक सहा महिन्यांच्या बालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. या तिघांचे दोन्ही कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर या तिघानाही शनिवारी जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन होम क्वारंटाईन करण्यात आले. सद्यस्थितीत जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.