मिरकरवाड्यात सामूहिक नमाज पठण करणाऱ्या 25 जणांवर कारवाई

रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा येथे खासगी इमारतीवर सामुहिक नमाज पठण करणार्‍या 25 जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी संचारबंदीचे उल्लंघन करून कोरोनाचा संसर्ग वाढविण्याचे कृत्य केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
 मुस्लिम बांधवांनी नमाज न पडण्यासाठी एकत्र येऊ नये, वैयक्तिक स्तरावर नमाज पठण करावे, असे आवाहन केले होते. मात्र काही ठरावीक मुस्लिम बांधव कायदा धाब्यावर बसवून एकत्र आल्याची पुढे आले आहे. शहर पोलिसांना तशी माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक मिरकरवाडा येथे जाऊन त्यांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली. तेव्हा तेथील एका इमारतीवर 25 जण सामुहिक नामज पठण करीत असताना आढळून आली. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. त्यांनी संचारबंदीचे उल्लंघन करून कोरोना संसर्ग वाढविण्याचे कृत्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.