त्या बालकाचा दुसराही अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी:- साखरतर येथील सहा महिन्याच्या त्या बालकाचा दुसरा कोरोना अहवाल आत्ताच प्राप्त झाला हा दुसरा अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे.शुक्रवारी सायंकाळी एकूण चार जणांचे अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या बालकाचा पहिला निगेटिव्ह अहवाल काल प्राप्त झाला होता त्यानंतर 24 तासांच्या अंतराने केलेल्या तपासणीचा अहवाल आज प्राप्त झाला असून हा अहवाल देखील निगेटिव्ह आहे. या अहवालानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे.