किरकोळ कारणावरून तरुणावर सुरीने वार

रत्नागिरी:- तालुक्यातील तरवळ येथे किरकोळ कारणातून तरुणावर धारदार सुरीने सपासप वार करुन त्याला गंभीर जखमी केल्या प्रकरणी प्रौढाला ग्रामीण पोलिसांनी अटक केली. ही घटना गुरुवारी रात्री ८.३० च्य सुमारास घडली. 

विजय गंगाराम माचिवले ( ५३ . रा . माचिवलेवाडी तरवळ, रत्नागिरी ) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात राजेंद्र भिकाजी माचिवले (३५, रा. माचिवलेवाडी तरवळ, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, वाडीच्या बैठकित विजय माचिवले याने राजेंद्र माचिवले हा गावात दारु विक्रीचा चोरटा धंदा करतो अशी खोटी बातमी पसरवली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी राजेंद्र आला असता या गोष्टीचा राग आल्याने विजयने त्याला प्रथम शिवीगाळ करत हातांनी मारहाण केली. त्यानंतर त्याने आपल्याजवळील सुरीने राजेंद्रच्या उजव्या हातावर आणि डाव्या पायावर सुरीने सपासप वार करुन त्याला गंभीर जखमी करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विजय माचिवलेला शुक्रवारी दुपारी ३वा. अटक करण्यात आली. अधिक तपास पोलिस करत आहेत.