साखरतर मधील सहा महिन्यांच्या बाळाचा अहवालही निगेटिव्ह

रत्नागिरी :- तालुक्यात सर्वाधिक रुग्ण असलेल्या साखरतर येथील अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाचा कोरोना अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे. यामुळे जिल्हा कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर असून नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे ना. उदय सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे सहा रुग्ण सापडले. यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 1 जण घरी तर 1 जण  रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आला आहे. 

सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या साखरतर येथील रुग्णांच्या अहवालावर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष होते. साखरतर येथील 2 महिला आणि एका सहा महिन्यांच्या बच्चूला कोरोनाची लागण झाली होती. 2 महिलांचा अहवाल यापूर्वीच निगेटिव्ह आला होता. आता 6 महिन्याच्या बच्चू चा अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यावरचे कोरोनाचे संकट कमी झाले आहे.