रत्नागिरी :- रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला येथे जमावबंदीचा भंग करीत महिलेला घरात घुसून मारहाण करण्यात आली. गैरकायदा जमाव करत महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी ४.३० वाजण्याच्या सुमारास कावळेवाडी परिसरात घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आराध्या अवधुत मोरे यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केल्याची घटना घडली.जिल्ह्यात सर्वत्र जमाव बंदी असताना या आदेशाचे उल्लंघन करत महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण करण्यात आली.याप्रकरणी आराध्या यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली.
या तक्रारीवरून पोलिसांनी सुकन्या नंदकुमार मयेकर,सिद्धार्थ नंदकुमार मयेकर, वैशाली राजेश मोरे,राजेश विजय मोरे, राकेश विजय मोरे,यश राकेश मोरे यांच्या विरोधात मनाई आदेश जारी असताना संगनमताने गैरकायदा जमाव करून महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण केल्याप्रकरणी भा.द.वि.क.४५२,१४३,१४९,३२३,५०४,५०४,४२७,२६९,१८८, महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७(१),(३) चा भंग कलम १३५, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम २००५ चे कलम ५१(ब), साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील कलम ३ ,महाराष्ट्र कोविड-१९ विनियम २०२० चे कलम ११ नुसार गुन्हा दाखल केला आहे.याचा पुढील तपास पोहेकॉ जाधव करीत आहेत.