जिल्ह्यात 500 पैकी 469 अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी :-  24 तासात एकूण 8 अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेले सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. जिल्ह्यात तपासणीसाठी एकूण 500 नमुने घेण्यात आले होते. यापैकी 6 अहवाल पॉझिटीव्ह तर 469 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 23 अहवाल प्रलंबित तर 2 अहवाल नाकारण्यात आले आहेत.

जिल्ह्यात होम क्वारंटाईनखाली असणाऱ्यांची एकूण संख्या 1 हजार 118 आहे. संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 476 आहे. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय 18 जण, उपजिल्हा रुग्णालय कामथे 1, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी 1, ग्रामीण रुग्णालय, दापोली 4, ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर 4, तहसिलदार, दापोली 60, तहसिलदार खेड 160, तहसिलदार रत्नागिरी 4, तहसिलदार संगमेश्वर 48, तहसिलदार चिपळूण 47 तहसिलदार, मंडणगड 53, तहसिलदार लांजा 13, तहसिलदार गुहागर 20 आणि तहसिलदार राजापूर मध्ये 43 जण होम क्वारंटाईन आहेत. केशरी कार्ड धारकांना 1 लाख उत्पन्नाची मर्यादा लक्षात घेऊन मे आणि जूनसाठी गहू व तांदूळ सवलतीच्या दरात देण्यात येणार आहे. यातील 70 टक्के साठा प्राप्त झाला आहे. यामुळे शुक्रवार 24 एप्रिल 2020 पासून कार्डनिहाय कोट्याच्या  70 टक्के धान्य वाटपास सुरुवात होईल.