रत्नागिरी :- लॉकडाऊनच्या काळात कोकणच्या हापूस आंबा वाहतुकीसाठी सर्वोत्तम पर्याय ठरलेल्या कोकण रेल्वेची ‘स्पेशल आंबा पार्सल व्हॅन’ आज गुरुवारी 23 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता रत्नागिरी स्थानकातून सुटणार आहे. रत्नागिरी, पनवेल, वसई रोड, वाफी, सुरत, बडोदा, भरूच, अहमदाबाद, सुरेंद्रनाथ नगर, राजकोट, ओखा अशामार्गे 15 तासात ही गाडी पोहोचणार आहेत. सध्या या गाडीला 5 पार्सल डब्बे आहे. तर अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. अशी गाडी सुरू करण्याकरिता माजी आमदार बाळ माने यांनी माजी रेल्वेमंत्री व कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू, कोकणचे नेते खासदार नारायण राणे यांच्याकडे विनंती पत्र पाठवले होते. त्यांच्या प्रयत्नाने ही स्पेशल रेल्वे सुरू झाली आहे. यामुळे कोकणातील हजारो टन अस्सल कोकणी हापूस आंबा गुजरात राज्यात पोहोचणार आहे. यापुढेही अशा गाड्या सोडण्याची मागणी करण्यात आली असून हापूस आंब उत्पादक शेतकर्यांनी आवश्यक त्या नियमांचे पालन करून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. बाळ माने यांनी केले आहे.