साखरतर मधील दोन्ही महिला कोरोना निगेटीव्ह

रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्यातील 52 तपासणी अहवाल बुधवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त झाले आहेत. या अहवालानुसार साखरतर येथील दोन्ही महिलांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.यासोबतच आणखी 52 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. यामध्ये कामथे उपजिल्हा रुग्णालयातील दहा रुग्णांचे अहवाल देखील निगेटिव्ह आले आहेत. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील चाळीस रुग्णांचे तपासणी अहवाल बुधवारी सकाळी प्राप्त झाले हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेेेत.  यामुळे एकूण प्रलंबित 68 अहवाल आणि पैकी 52 अहवाल आतापर्यंत प्राप्त झाले असून हे सर्व निगेटिव्ह आलेले आहेत. आता केवळ 6 महिन्याच्या बाळाचे रिपोर्ट बाकी असून रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असून अंत्यत दिलासादायक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.