रत्नागिरी :- जानेवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत (बीडीएस) नवनिर्माण इंग्लिश मेडियम स्कूल रत्नागिरी (सीबीएसई) च्या मयुरेश चव्हाण याने दमदार कामगिरी केली आहे. इयत्ता 1 ली मध्ये शिक्षण घेणाऱ्या मयुरेश याने या परीक्षेत 100 पैकी 80 गुण मिळवून ब्राँझ पदक मिळवलेे आहे.
बीडीएस परीक्षा ही शाळेच्या प्राथमिक टप्प्यात अत्यंत महत्वाची समजली जाते. या परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी फॉर्म शाळेतून पाठवले जातात. मयुरेश चव्हाण याने या परीक्षेसाठी कोणताही जादा क्लास लावला नाही. शाळेत शिकवलेल्या अभ्यासाच्या आधारे तसेच पालक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने त्याने या परीक्षेची तयारी केली होती. नुकताच बीडीएस परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत मयुरेश चव्हाण याने 100 पैकी 80 गुण मिळवले. त्याच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षक आणि सहकारी विद्यार्थ्यानी मयुरेशचे अभिनंदन केले आहे. लॉकडाऊनमुळे सध्या शाळेला सुट्टी असल्याने शिक्षक व मुख्याध्यापिकांनी मयुरेशला फोनवरुन शुभेच्छा दिल्या.